
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष जागा मिळवली आहे. या शोमधील प्रत्येकाची भूमिका, प्रत्येक पात्र लोकांना खूप आवडतं. जेठालाल आणि भिडेचं पात्र या दोघांना तर लोकांची प्रचंड पसंती मिळते. (फोटो क्रेडिट - TMKOC)

या शोमध्ये जेठालाल आणि भिडे या दोघांची तर एकमेकांशी चांगली मैत्री दाखवली आहे, पण बऱ्याचदा त्यांच्यात विविध मुद्यांवरून वाद होत असतो. दोघांमध्ये सर्वात जास्त वाजतं ते तर गोकुळधाम सोसायटीच्या मेंटेनन्सच्या मुद्यावरूनच.

खरंतर, जेठालाल दर महिन्याला मेंटेनन्सचा चेक द्यायला विसरतो. भिडेने या गोष्टीची आठवण करून दिल्यानंतरच जेठालाल मेंटेनन्स भरतो. याच मुद्यावरून दोघांमध्ये बऱ्याचदा भांडण होत असतं. पण त्यांच्या या सोसायटीचा मेंटेनन्स किती आहे, ते तुम्हाला माहीत आहे का ?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोच्या 3610 या एपिसोडमध्ये मेंटेनन्सशी निगडीत एक स्टोरी दाखवण्यात आली होती. त्याच भागात जेठालाल हा भिडेंना मेंटेनन्सचा चेक देतानाही दिसला होता.

जेठालालने भिडेंना जो चेक दिला, त्यावर 2500 रुपयांची रक्कमी लिहीलेली होती. म्हणजेच गोकूळधाम सोसायटीता मेंटेनन्स हा 2500 रुपये इतका आहे.