
तनय छेडाने बालकलाकार म्हणून अनेक सिनेमे केले आहेत, त्यापैकी 'तारे जमीन पर' हा सिनेमा महत्त्वाचा ठरला. यामध्ये त्याने एका अपंग मुलाची भूमिका साकारली जी लोकांच्या मनाला भिडली.

तनयने शाहरुख खानसोबत 'डॉन' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातही तनय एक महत्त्वाची भूमिका बजावत होता आणि त्याच्या कामाचं कौतुक झालं होतं.

तनय छेडाचा जन्म 27 जून 1996 रोजी मुंबईत झाला आणि त्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. आता तनय इतका मोठा झाला आहे की त्याला ओळखणं कठीण झालं आहे आणि त्याचं लग्नही झालं आहे.

तनयने 2023 मध्ये युविका नावाच्या मुलीशी लग्न केलं. तनयने त्याच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यामध्ये तो त्याच्या पत्नीसोबत एक खास नाते शेअर करताना दिसत आहे.

2024 मध्ये, तनय छेडा याची 'कॅडेट्स' ही वेब सिरीज रिलीज झाली. जी जिओ सिनेमा म्हणजेच जिओहॉटस्टारवर प्रसारित होते. याशिवाय, तो इतर अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. ज्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.