सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत अभिनेत्रीचं रिलेशनशिप पक्कं; एअरपोर्टवर जोडी दिसली एकत्र

ही अभिनेत्री कपूर घराण्याची सून होणार होती. परंतु लग्नाआधीच तिचं ब्रेकअप झालं. त्यानंतर त्याने या अभिनेत्रीच्या खास मैत्रिणीशी लग्न केलं. तर सुशीलकुमार शिंदे यांचा हा नातू आधी अभिनेत्री सारा अली खानला डेट करत होता.

| Updated on: Jul 25, 2025 | 11:26 AM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीत एका नव्या जोडीची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री तारा सुतारियाने नुकतंच अभिनेता वीर पहाडियासोबतच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला आहे. इन्स्टाग्रामवरील एक कमेंटमुळे या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यानंतर आता दोघं एकत्र दिसले आहेत.

2 / 5
ताराने गायक एपी ढिल्लनसोबत फोटो पोस्ट केला होता. त्यावर वीर पहाडियाने 'माझी' अशी कमेंट करत हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता. तर दुसरीकडे तारानेही 'माझा' असं लिहिलं होतं. यावरून दोघांनीही त्यांचं नातं जगजाहीर करायचं ठरवलंय, हे नेटकऱ्यांच्या लक्षात आलं.

3 / 5
प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर आता तारा आणि वीर पुन्हा एकत्र दिसले आहेत. मुंबई एअरपोर्टवर या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. यावेळी एअरपोर्टवर वीर त्याच्या गाडीतून उतरल्यानंतर तारासाठी त्याने गाडीचा दरवाजा उघडला. त्यानंतर दोघांनी पापाराझींना फोटोसाठी पोझ दिले आणि एकमेकांशी रोमँटिक अंदाजात बोलत आत गेले.

4 / 5
वीर आणि तारा यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. या दोघांनी एका फॅशन शोमध्ये एकत्र रॅम्प वॉक केला होता. त्यानंतर दोघं एकत्र इटलीला फिरायला गेले होते. एकाच लोकेशनवरून त्यांनी फोटो शेअर केले होते.

5 / 5
वीर आणि तारा एकमेकांना डेट करण्याआधी त्यांच्या आधीच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत होते. वीर हा अभिनेत्री सारा अली खानला डेट करत होता, तर तारा ही कपूर घराण्यातील आदर जैनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आदर आणि तारा लग्नही करणार होते, परंतु त्याआधीच त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आदरने ताराच्याच मैत्रिणीशी लग्न केलं.