वर्ल्डकप 2027चा प्लॅन लीक, रोहित-कोहली खेळणार की नाही? कोच गौतम गंभीरचा मोठा खुलासा

भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलला रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंचा अनुभव आणि मार्गदर्शन मिळत असल्याने तो नशीबवान असल्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने म्हटले आहे. पण हे दोघे 2027 चा वर्ल्डकप खेळणार का नाही याबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 23, 2026 | 10:26 PM
1 / 5
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं म्हटलं आहे की, वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार शुभमन गिल खूप नशीबवान आहे. कारण त्याला मैदानात आणि मैदानाबाहेर मदत करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू लाभले आहेत.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं म्हटलं आहे की, वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार शुभमन गिल खूप नशीबवान आहे. कारण त्याला मैदानात आणि मैदानाबाहेर मदत करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू लाभले आहेत.

2 / 5

युवा कर्णधारासाठी प्लेइंग-११ मधून खेळाडूंना बाहेर बसवण्यासारखे कठीण निर्णय घेणे सोपे नसते, असं गंभीर म्हणालाय. मात्र, रोहित आणि विराटच्या प्रदीर्घ अनुभवामुळे गिलला अशा आव्हानात्मक परिस्थितीत संघाचे नेतृत्व करताना मोठी मदत मिळत राहते.

3 / 5

गंभीरनं गिलच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळताना तो शांत, निःस्वार्थ आणि आक्रमक असल्याचे सांगितले. त्याने आतापर्यंत एक कर्णधार म्हणून सर्व जबाबदाऱ्या अतिशय योग्य पद्धतीने पार पाडल्या आहेत.

4 / 5

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्या गिलचा काळ थोडा कठीण जात असला तरी, गंभीरनं त्याला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. गिलने योग्य दिशेने प्रयत्न सुरू ठेवले असल्याने लवकरच तो पुन्हा लयीत परतेल, असा ठाम विश्वास गंभीरनं व्यक्त केला.

5 / 5

गौतम गंभीरच्या या वक्तव्यावरून २०२७ च्या वनडे विश्वचषकाचा मास्टरप्लॅन बऱ्यापैकी स्पष्ट झाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही अनुभवी खेळाडू या आगामी विश्वचषकात भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग असणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us