
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या तेजस या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच कंगना राणावत हिचा हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला ओपनिंगला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही.

तेजस चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कंगना राणावत ही दिसली. हा चित्रपट धमाका करणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात देखील आले. मात्र, प्रत्यक्षात ते घडू शकले नाहीये.

तेजस चित्रपटाने ओपनिंग डेला 2 ते 3 कोटींचे कलेक्शन केले. ओपनिंग डेला चित्रपट 10 कोटींच्या आसपास कमाई करण्याचा अंदाजा होता. मात्र, तसे झाले नाही.

आता विकेंडला चित्रपट काही धमाका करणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांनी कंगनाच्या अभिनयाचे काैतुक केले.

तेजस चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल. कंगना राणावत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली.