
कोरोनाचा संसर्ग आल्यानंतर गेल्यावर्षी पहिल्यांदाच राज्यात गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. आता ही थाळी 10 रुपयांऐवजी 5 रुपयांत देण्यात येत होती. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग निर्माण झाल्याने आणि संचारबंदी लागू केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांसाठी शिवथाळी मोफत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागानं मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. कोरोनाचं हे संकट ओढावल्यामुळे अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत असल्याने नाशिकमध्ये शिवभोजन थाळी केंद्रावर अनेकांनी रांगा लावून या थाळीचा अस्वाद घेतला.

संचारबंदीच्या काळात ज्यांच्याकडे काम नाही अशा गरजू कुटुंबांसाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडताना दिसतेय. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

सर्व नियम पाळत या शिवभोजन थाळीचं वितरण होत आहे.