
द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीजनसाठी मनोज बाजपेयीला भरपूर मानधन मिळालय. या सीरीजसाठी मनोज बाजपेयीला 20 ते 22 कोटी रुपये मिळाले आहेत. पहिल्या सीजनसाठी त्याला इतकी फि मिळाली नव्हती. सीरीजच यश आणि मनोजला वाढत्या लोकप्रियतेचा फायदा मिळाला आहे.

मनोज बाजपेयीशिवाय या सीरीजमध्ये एन्ट्री करणाऱ्या दोन मोठ्या स्टार्सना काय-काय मिळालय? हे तुम्हाला माहित आहे का?. अनेक चित्रपट आणि सीरीजमध्ये शानदार अभिनय करणाऱ्या जयदीप अहलावतला द फॅमिली मॅन सीरीजसाठी 9 कोटी रुपये मिळाले आहेत.

त्याशिवाय निम्रत कौरची सरप्राइज एंट्री झाली. रिपोर्ट्सनुसार, या सीरीजसाठी निम्रत कौरने 8 ते 9 कोटी रुपये घेतले आहेत. सीरीजमधील तिचा रोल मिस्टीरियस आहे. फॅन्सच म्हणणं आहे की, तिचा रोल सीरीजमध्ये एक्सटेंडेड कॅमियो पेक्षा जास्त काही नाही.

सीरीजच्या कास्टबद्दल बोलायचं झाल्यास मनोज बाजपेयीशिवाय प्रियामणीने श्रीकांतच्या पत्नीचा रोल केला आहे. रिपोर्ट्सनुसार सीरिजच्या तिसऱ्या सीजनसाठी तिला 7 कोटी रुपयाच्या आसपास मानधन मिळालं आहे.

जे के तलपदेची भूमिका साकारुन अभिनेता शब्बीर हाशमीने या सीरीज आपल्या अभिनयाने फॅन्सना प्रभावित केलय. त्याला या सीरीजसाठी चांगली फि सुद्धा मिळाली आहे. ही सीरीज तुम्ही प्राइम वीडियोवर पाहू शकता.