‘द केरळ फाइल्स’ फेम अभिनेत्रीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अदाने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. अदाच्या या पोस्टवर चाहतेसुद्धा प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.

| Updated on: Nov 26, 2025 | 12:22 PM
1 / 5
'द केरळ फाइल्स' फेम अभिनेत्री अदा शर्मावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अदाच्या आजीचं निधन झालं आहे. आजीच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या खास क्षणांचे फोटो पोस्ट करत अदाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 5
'ओम शांती. आमच्या पातीची (माझी आजी) हीच इच्छा होती की ती अशाच पद्धतीने आपल्या आठवणीत राहावी. तिचा नेहमीच आदर करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार. तीन दिवसांपूर्वी तिचं निधन झालं होतं', अशी पोस्ट अदाने लिहिली आहे.

3 / 5
अदाची आजी गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि डायव्हर्टिकुलायटिसने त्या ग्रस्त होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अदाचं तिच्या आजीशी खूप जवळचं नातं होतं. सोशल मीडियावर ती अनेकदा त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची.

4 / 5
अदा शर्माने 2008 मध्ये '1920' या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली. तिथे ती 'कमांडो 2'मध्ये झळकली.

5 / 5
अदाने 'हंसी तो फंसी', 'हार्ट अटॅक' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. 2023 मध्ये तिने 'द केरळ स्टोरी'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. अदाची आई केरळची असून त्यासुद्धा शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्यामुळे अदासुद्धा उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यांगना बनली.