
द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाला मोठा विरोध करण्यात आला. मात्र, प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळताना दिसत आहे.

द केरळ स्टोरी यंदाच्या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरलाय. पुढील काही दिवस देखील द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल असे सांगितले जातंय.

द केरळ स्टोरी चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केलीये. सुरूवातीच्या आकड्यांनुसार द केरळ स्टोरी चित्रपटाने 28 मे 2023 अर्थात रविवारी तब्बल 5 कोटींची कमाई केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

रविवारच्या कमाईच्या आकड्यामध्ये वाढ देखील होऊ शकते. द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी अनेकांनी थेट कोर्टात धाव देखील घेतल्या होत्या. मात्र, धमाल करताना चित्रपट दिसतोय.

बाॅलिवूडचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत असतानाच द केरळ स्टोरी चित्रपटाने मोठी कमाई केलीये. विशेष म्हणजे चित्रपटाची ओपनिंगही जबरदस्त अशी नक्कीच ठरलीये.