
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा ओएमजी 2 हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

अक्षय कुमार हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, अक्षय कुमार याच्या या आगामी चित्रपटाचे नाव तब्बल चार वेळा बदलण्यात आलंय. आता या चित्रपटाच्या टीजरची तारीख जाहीर करण्यात आलीये.

या चित्रपटाची स्टोरी ही कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका करणाऱ्या एका धाडसी इंजिनिअरची भोवती फिरताना दिसणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात इंजिनिअरच्या भूमिकेत आहे.

या चित्रपटाचे नाव तब्बल चार वेळा बदलण्यात आल्याने आता सर्वच जण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. सर्वात अगोदर या चित्रपटाचे नाव कॅप्सूल गिल होते.

अक्षय कुमार हा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करताना दिसतो. अक्षय कुमार हा एका पोस्टसाठी 1 कोटी रूपये फिस घेतो. अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो.