Photo Gallery: काळ्या मातीत बैलगाडी शर्यतीचा थरार अन् तरुणांचा उत्साह शिघेला..!

| Updated on: Mar 05, 2022 | 12:09 PM

अकोला : सर्वेच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर आता जिल्ह्यानिहाय बैलगाड्यांच्या शर्यती पार पडत आहे. मात्र या दरम्यान, शर्यतीचा थरार आणि उपस्थित शेतकऱ्यांचा उत्साह काही औरच असतो. असाच थरार अकोला जिल्हातल्या घुसरवाडीतल्या काळ्या मातीत रंगला होता. ढवळ्या पवळ्या सर्जा राजाची जोडी जिंकली पाहिजे म्हणून सर्व ताकतीनिशी मैदानात उतरलेल्या धुर कऱ्याचा जोश आणि उत्साह हा पाहण्यासारखा होता. बैलगाडी शर्यचतीचे अनेक उद्देश आहेत. ग्रामीण भागातल्या शेतीशी संबंधित अर्थकारणाला यामुळे चालना मिळते शिवाय बैलांची खरेदी विक्री यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. घुसरवाडीत आयोजित या शर्यतीमध्ये सर्व उद्देश साध्य झाल्याचे चित्र होते.

1 / 5
शंकरपट हा झालाच पाहिजे : बैलगाडी शर्यतीचा उद्देश केवळ करमणूक हा नसून यामधून आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकरणाला वेगळीच दिशा मिळते. त्यामुळे शंकरपट झालेच पाहिजे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहेत.

2 / 5
तरुणांचा उत्साह : घुसरवाडीतल्या शिवारात ही बैलगाडी शर्यत पार पडली. दरम्यान, शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, सर्जा राजाची जोडी जिंकली पाहिजे म्हणून सर्व ताकतीनिशी मैदानात उतरलेल्या धुर कऱ्याचा जोश आणि उत्साह हा पाहण्यासारखा होता.

3 / 5
आठवडी बाजारही सुधारतो : शर्यतीमध्ये धावलेल्या बैलांना नंतर फार मोठी किंमत मिळते. शर्यतीसाठी ही बैल योग्य आहेत असे समजून त्यांची मागणी वाढते. परिसरातील आठवडी बाजारात एक वेगळेच चित्र निर्माण होते.

4 / 5
कृषी संस्कृतीचे घडते दर्शन : काळाच्या ओघात आमच्या ग्रामीण संस्कृतीला समृद्ध करणाऱ्या अनेक परंपरा वीलुप्त होताना दिसत आहेत. शंकर पटा सारख्या कृषी संस्कृतीचे महत्त्व वाढवणाऱ्या परंपरा आणि क्रीडा प्रकारांना लोकाश्रया सोबतच राजाश्रय मिळवून देण सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

5 / 5
6 सेकंदामध्ये 100 मीटर अंतर : या बैलगाडी शर्यतीमध्ये लढाणा जिल्हातल्या चिखली तालुक्यातील वैरागड येथील गोविंदा मोरे यांच्या खिल्लारी बैल जोडीने 100 मिटर अंतर 6 सेकंड 8 पॉईंट मध्ये पार करत या शर्यतीत प्राथक क्रमांक मिळवला आहे. विजयानंतर एकच जल्लोष करण्यात आला होता.