ना जास्त खर्च, ना जास्त वेळ प्रवास, कल्याणच्या जवळ लपलाय हा सुंदर धबधबा, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
ना जास्त खर्च, ना जास्त प्रवास, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे हा धबधबा. पावसाळ्यात पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात असते गर्दी. कसं जायचं?

दररोजच्या कामातून वेळ काढून जर तुम्हाला रविवारी शहरापासून दूर सुंदर निसर्गरम्य वातावरणात किंवा धबधब्याचा आनंद घेयचा असेल तर मुंबईपासून फक्त हाकेच्या अंतरावर आहे खास ठिकाण.

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला ना जास्त खर्च येतो ना तुम्हाला जास्त वेळ प्रवास करावा लागत नाही. हे ठिकाण म्हणजे टिटवाळ्याजवळी वाघेरा पाडा धबधबा.

पावसाळा सुरू होताच वाघेरा पाडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालू लागतो. हिरवाईने नटलेला परिसर, धुक्याची चादर आणि खळखळणारे धबधबे यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरते.

कल्याण–मुर्बाड मार्गावरील कंबा गावाजवळ, मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा धबधबा असून टिटवाळा रेल्वे स्थानकापासून रिक्षाने येथे सहज पोहोचता येते.

पावसाळ्यात येथे एकाच परिसरात चार वेगवेगळे धबधबे पाहण्याची संधी मिळते. धबधब्याच्या परिसरात जंगल ट्रेकिंग, निसर्ग छायाचित्रण तसेच नैसर्गिक खडकांमध्ये तयार झालेल्या पाण्याच्या कुंडांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. जुलै ते सप्टेंबर हा काळ येथे भेट देण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो.