
ज्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो अशा लोकांनी बदाम जास्त प्रमाणात खाऊ नये. बदाममध्ये हायड्रोसायनिक एॅसिड असते जे श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरते.

ज्या लोकांना गॅस, एसिडीटी, जळजळ या समस्या असतात अशा लोकांनी बदाम जास्त प्रमाणात खाऊ नये. कारण अशा लोकांनी बदाम खाल्लं तर त्यांची जळजळ होण्याची समस्या आणखी वाढू शकते.

ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर असते अशा लोकांनी जास्त प्रमाणात बदाम खाऊ नये. नाहीतर त्यांनी जास्त बदाम खाल्ले तर त्यांचं पोट जड होऊ शकतं आणि उलटीचा त्रास होऊ शकतो.

जर तुम्ही जास्त प्रमाणात बदाम खात असाल तर तुम्हाला पोषक तत्वे घेण्यास जड जाऊ शकतं त्यामुळे दिवसातून एक ते दोन बदाम खा.

ज्या लोकांना मूतखड्याचा त्रास आहे अशा लोकांनी बदाम खाऊ नये. नाहीतर त्यांचा त्रास जास्त वाढू शकतो.