
पाण्याची बाटली: तुम्ही जी पाण्याची बाटली दररोज वापरता, त्या बाटलीवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. हफपोस्टच्या अभ्यासानुसार, पाण्याच्या बाटलीच्या झाकणाजवळ, तोंडाजवळ विविध प्रकारचे बॅक्टेरिया असतात. याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

दरवाजाचा हँडल: दाराची सफाई करताना अनेकदा आपण हँडल स्वच्छ करायला विसरतो. तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या दरवाजांना असंख्य लोक स्पर्श करतात, त्यामुळे येथील हँडलवर जीवघेणे बॅक्टेरिया असतात.

रिमोट: घरातील टीव्हीच्या रिमोटवर स्वच्छतेअभावी जंतू आणि बॅक्टेरिया जमा होतात. घरातील सर्वजण त्याला स्पर्श करतात, त्यामुळे बॅक्टेरिया घरातही पसरतो. तसेच माऊसवर देखील मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया जमा होतात.

उशी, ब्रश: घरातील जुन्या उशा, भांडी धुण्याचा स्पंज यामध्येही बॅक्टेरिया असतो. तसेच जुन्या टूथब्रशमध्येही बॅक्टेरिया असतो. त्यामुळे या सर्व वस्तू वेळोवेळी स्वच्छ करा किंवा बदला.

मेनू कार्ड: हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मेनू कार्डवर खूप मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात. कारण बऱ्याच हॉटेलमधील मेनू कार्ड वर्षानुवर्षे बदलले जात नाहीत. बरेच लोक त्याला स्पर्श करतात, त्यामुळे धोकादायक बॅक्टेरिया तयार होतो.