
अन्नातून पोषक घटक वेगळे करणे आणि ते शरीराच्या इतर भागात पोहोचवणे हे शरीरातील आतड्यांचे कार्य आहे. आतड्यांचे आरोग्य बिघडले तर पचनसंस्था बिघडते. असे काही पदार्थ आहेत, जे खाल्यामुळे आतड्यांचे हळूहळू मोठं नुकसान होऊ शकतं. हे पदार्थ आतड्यांसाठी सायलेंट किलर समजले जातात.

साखर - साखरेशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. पण हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या शरीरातील हेल्दी बॅक्टेरिया नष्ट करतो. साखरेमुळे आतड्यांना सूज येऊ शकते. त्यामुळे रोजच्या जीवनात याचा आहारातील वापर कमी करणे आवश्यक आहे.

मैदा - आजकाल, सहसा प्रत्येक व्यक्ती मैद्याचा एखादा तरी पदार्थ दररोज खात असते. मैद्यामुळे अन्न चविष्ट लागते, पण आतड्यांसाठी ते विषापेक्षा कमी नाही. त्यात फायबर नसल्यामुळे मैद्यापासून दूर राहणेच चांगले ठरते.

सॅच्युरेटेड फॅट्स - ज्या पदार्थांमध्ये फॅट्स जास्त असतात, ते आतड्यांमधून चांगले बॅक्टेरिया संपवतात. फुल क्रीम दूध किंवा लोणी हे चविष्ट असले तर त्याच्या अति सेवनामुळे भविष्यात त्रास होऊ शकतो.

जास्त फायबर - फायबर हे पोटासाठी वरदान मानले जाते, पण त्यामुळे आतड्याला हानीही पोहोचू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? असे म्हटले जाते की जर फायबरचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळेही शरीराचे नुकसान होऊ शकते.