
वर्ल्ड कपमध्ये सर्व संघांनी आपल्या 15 तगड्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये झकास कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड झाली आहे.

वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघाला नऊ साखळी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर टॉप-4 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. हा सर्व प्रवास करत फायनलमध्ये एन्ट्री मिळणार आहे.

वर्ल्ड कप फायनल ही 16 नोव्हेंबरला होणार असून कोणते संघ प्रवेश करतील याबाबत डेल स्टेनने दोन संघाची नावं घेतली आहेत.

माझी इच्छा आहे की दक्षिण आफ्रिका संघाने फायनलमध्यो पोहोचावं. पण मला वाटते की भारत आणि इंग्लंड यांच्यात फायनल होईल, असं स्टेन म्हणाला.

दरम्यान, भारतीय संघाची ताकद वाढलेली दिसत आहे. आताच आशिया कपं जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.