
अनेकांच्या घरा जवळ रुईचे झाड पाहायला मिळते. अशी झाडे चुकूनही घरात लावू नयेत. त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येते आणि धनाची हानी होते.

कोणत्याही प्रकारचे काटेरी रोप घराच्या आत लावू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, त्यामुळे घरात भांडणे सुरू होतात. अशी मान्याता आहे.

घरात पिंपळाचे झाड लावणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ मानले जाते कारण हे झाड पूजनीय मानले जाते. पण वास्तूनुसार घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड लावणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे घराचे मोठे आर्थिक नुकसान होते.

घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड लावणेही शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.