
रोहित शेट्टी याचा बहुचर्चित खतरो के खिलाडी 13 सध्या चर्चेत आहे. शोचे शूटिंग जवळपास पुर्ण झाल्याचे सांगितले जातंय. खतरो के खिलाडी 13 मध्ये डीनो जेम्स देखील सहभागी झाला.

नुकताच डीनो जेम्स याने खतरो के खिलाडी 13 मध्ये भयंकर असा एक किस्सा सांगितला आहे. शोमधील एका स्टंटनंतर तब्बल चार दिवस त्याचा आवाज गेल्याचे त्याने सांगितले आहे.

सिंगरचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. खतरो के खिलाडीमधील सर्वात खतरनाक स्टंट हा शॉक असल्याचे डीनो जेम्स याने सांगितले.

शॉकचा स्टंट करत असताना त्याला खूप जास्त त्रास झाला. इतकेच नाही तर त्याचा थेट आवाज देखील चार दिवसांसाठी गेला होता. त्याला अजिबातच बोलता येत नव्हते.

डीनो जेम्स म्हणाला की, बरेच लोक शॉकचा स्टंट करत नाहीत. पण तो स्टंट करण्याचा मी निर्णय घेतला. मात्र, हा स्टंट करताना मला खूप जास्त त्रास झाला.