
ज्या चित्रपटाला अनेक अभिनेत्रींनी नकार दिला होता, त्याच चित्रपटामुळे कपूर कुटुंबातील लेकीचं नशीब चमकलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. आजही या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेला हा चित्रपट 'राजा हिंदुस्तानी' आहे. ज्यामध्ये करिश्मा कपूर आणि आमिर खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

करिश्मा आणि आमिरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. यामध्ये दोघांचा एक किसिंग सीनसुद्धा होता, ज्याची तुफान चर्चा झाली होती. या एका किसिंग सीनसाठी तब्बल 47 रिटेक्स द्यावे लागले होते.

अनेकदा असं म्हटलं जातं की कपूर घराण्यातील मुलींना आणि सुनांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची परवानगी नव्हती. कपूर कुटुंबातील करिश्मा ही पहिली मुलगी होती, जी हा नियम मोडून फिल्म इंडस्ट्रीत काम करू लागली. करिश्माने 'प्रेम कैदी' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात तिने स्विमसूट घातला होता. यावरून तिचे काका फार भडकले होते, असं म्हटलं जातं.

पहिल्याच चित्रपटातून इतकं अंगप्रदर्शन करणं योग्य नाही, असं ते म्हणाले होते. याबद्दल जेव्हा करिश्माला 'स्टारडस्ट मॅगझिन'च्या मुलाखतीत विचारलं गेलं, तेव्हा तिने स्पष्ट उत्तर दिलं होतं की, जर माझ्या आईवडिलांना काही समस्या नाही, तर इतरांनाही नसली पाहिजे.

'राजा हिंदुस्तानी'मधील सर्वांत मोठा किसिंग सीन उटीमध्ये शूट झाला होता. राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत करिश्माने सांगितलं होतं की, कडाक्याच्या थंडीत त्यांनी तो सीन शूट केला होता. तो सीन पूर्ण करण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले होते.

'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटाची ऑफर मनीषा कोइराला आणि जूही चावला यांनी नाकारली होती. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या रायलाही या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. परंतु तारखा जुळत नसल्याने तिने ती ऑफर नाकारली.