मोठी बातमी! मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे एमआयडीसी परिसरातील जाधववाडी धरणात दुर्दैवी घटना घडली आहे. पोहण्यासाठी उतरलेल्या सहा जणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

| Updated on: May 01, 2026 | 7:42 PM
1 / 5
मोठी बातमी समोर येत आहे, मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे एमआयडीसी परिसरातील जाधववाडी धरणात दुर्दैवी घटना घडली आहे. पोहण्यासाठी उतरलेल्या सहा जणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे एमआयडीसी परिसरातील जाधववाडी धरणात दुर्दैवी घटना घडली आहे. पोहण्यासाठी उतरलेल्या सहा जणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

2 / 5
नवलाख उंब्रे येथे फिरण्यासाठी आलेल्या सहा जणांनी दुपारच्या सुमारास जाधववाडी धरणात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यापैकी तिघे जण पाण्यात बुडाले, तर उर्वरित तिघांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आलं आहे.

3 / 5
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, NDRF तसेच तळेगाव दाभाडे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य राबवत तिघांना पाण्याबाहेर काढलं.

4 / 5
पाण्याच्या बाहेर काढण्यात आलेल्या तिघांना  तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष एडके अशी मृतांची नावं आहेत.

5 / 5
तर स्थानिकांना ही घटना वेळीच लक्षात आल्यामुळे तिघांचा जीव वाचला आहे. तलावात किंवा धरणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पोहोण्यासाठी जात असाल तर आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Follow Us