Tim Cook: CEO म्हणून नाही तर शेअरमुळे नवकोट! ॲप्पलचे सीईओ टिम कुक हे इतक्या संपत्तीचे धनी

Tim Cook Networth: Apple कंपनीला एका नवीन उंचीवर पोहचवण्याचे काम टिम कूक यांनी केले. ते या बड्या कंपनीतून लवकरच बाहेर पडतील. पण टिम कूक यांची संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? महागड्या आयफोनची सीरीज आणणारे कूक हे नवकोट नारायण आहेत.

| Updated on: Apr 21, 2026 | 2:52 PM
1 / 6
Tim Cook Networth: जगभरातील बड्या कंपन्यांपैकी ॲप्पल ही एक कंपनी आहे. या कंपनीने घोषणा केली आहे की, टिम कूक सप्टेंबर 2026 मध्ये CEO पद सोडतील. त्यांच्या जागी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जॉन टर्नस (John Ternus) येतील.  65 वर्षीय टिम कुक CEO पद सोडल्यानंतर कंपनी बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष होतील.

Tim Cook Networth: जगभरातील बड्या कंपन्यांपैकी ॲप्पल ही एक कंपनी आहे. या कंपनीने घोषणा केली आहे की, टिम कूक सप्टेंबर 2026 मध्ये CEO पद सोडतील. त्यांच्या जागी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जॉन टर्नस (John Ternus) येतील. 65 वर्षीय टिम कुक CEO पद सोडल्यानंतर कंपनी बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष होतील.

2 / 6

टिम कुक यांनी 1998 मध्ये Apple Inc. कंपनीत नोकरी सुरू केली. हळूहळू ते COO पदावर आले. त्यांनी पुरवठा साखळी मजबूत केली. Apple चे CEO पद मिळणे हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता असे ते म्हणाले. कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली ही मोठी बाब असल्याचे ते म्हणाले

3 / 6

वर्ष 2011 मध्ये Steve Jobs यांनी प्रमुख पद सोडल्याने कुक CEO झाले. त्यांच्या नेतृत्वात Apple ने नवीन उत्पादनं बाजारात आणली. त्यांचे मूल्य बाजारात जवळपास 4 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचले. कुक यांनी चीनला ॲप्पलचे उत्पादन हब केले. तिथे Foxconn सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून iPhone तयार करण्यात येतात.

4 / 6

टिम कूल सातत्याने 15 वर्षांपर्यंत ॲप्पलचे सीईओ पदी होते. या दरम्यान त्यांची संपत्ती जवळपास 2.9 अब्ज डॉलर इतकी होती. इकोनॉमिक्स टाईम्सच्या एका अहवालानुसार, त्यांना नुकतेच जवळपास 9 दशलक्ष डॉलरच्या शेअरची विक्री केली. त्यांच्या हिश्याचा हा केवळ 0.33% टक्के भाग आहे.

5 / 6

टिम कुक यांच्या जवळ ॲप्पलचे 30 लाखांहून अधिक शेअर आहे. कंपनीत त्यांचा वाटा एक टक्क्यांहून कमी आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात 1 अब्ज डॉलरहून अधिक शेअरची विक्री केली आहे. 2005 मध्ये ते Nike Inc. च्या मंडळात सहभागी झाले.

6 / 6

टिम कुक CEO झाल्यानंतर ते ॲप्पल कंपनीचे जगभरातील प्रकल्पाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांचा पगार जवळपास 5 लाख डॉलर वार्षिक होता. वर्ष 2011 मध्ये CEO झाल्यावर त्यांचा पगार वाढून जवळपास 9 लाख डॉलर वार्षिक झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us