
दर महिन्याला तुमच्या कमाईचा काही भाग दानधर्मासाठी वापरा. यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. त्याच प्रमाणे घरातील स्त्रियांशी अत्यंत आदराने वागा. घरातील स्त्री देवीचेच रुप असते.

घरामध्ये तुळशीचे रोप लावा आणि रोज संध्याकाळी रोपाजवळ तुपाने भरलेला मातीचा दिवा लावा. या उपायामुळे तुम्हाच्या नेहमी सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देईल.

महिन्यातील कोणत्याही 3 शुक्रवारी अविवाहित मुलींना खीर खायला द्या आणि काही पैशांसह पिवळे कपडे दान करा. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते.

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी दर बुधवारी गाईला हिरवे गवत खायला द्यावे. घरामध्ये कधीही तुटलेली भांडी ठेवू नका किंवा वापरू नका. यामुळे वास्तुशास्त्राचे दोष निर्माण होतात.

प्रत्येक शुक्रवारी भगवान विष्णूला जल अर्पण करा. यामुळे लक्ष्मीजी खूप प्रसन्न होतात. दररोज लक्ष्मी मातेची मनोभावे पुजा करा.