Todays Gold Rate: 72 तासात सोने 7 हजार तर चांदी 10 हजारांनी घसरली! आज जळगावच्या सराफ बाजारात दर काय?
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांचा सोने खरेदीकडे कल आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत आठवड्याभरापासून सोने-चांदीच्या दरात सतत घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांचा सोने खरेदीकडे कल असल्याचे दिसत आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती आहे?
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या 72 तासात सोन्याच्या दरात 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
आज 22 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 27 हजार 205 रुपये आहे. सध्या सोने आणि चांदी दोन्ही वर्षभरातील सर्वात कमी दरात, ऑल टाइम लो वर आहेत. त्यामुळे बाजारात ग्राहकांची चांगली गर्दी पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 58 हजार 620 रुपये झाले आहेत. गेल्या 72 तासात चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)