Todays Gold Rate: सर्वसामान्यांना दिलासा! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज पुन्हा सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव...

अमेरिका व इराण यांच्या युद्धविरामाच्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणाव अजूनही पाहायला मिळत आहे. हा तणाव असाच राहिला तर त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होणार आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे जाणून घ्या...

आज जवळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीचे दर जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्यांसाठी ही दिसाला देणारी बातमी आहे.

आज सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात कुठलीही वाढ नाही, चांदीचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे.

21 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 57 हजार 281 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 62 हजार 650 रुपयांवरच आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)