Todays Gold Rate: तब्बल 8 हजार रुपयांची घसरण! सराफ बाजारात मोठे बदल, वाचा आजचा सोने आणि चांदीचा भाव
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव काय आहे? चला जाणून घेऊया....

आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होत असल्याचे दिसत आहे. हे भाव अस्थिर असल्याचे चित्र आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव काय आहे?
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात आज किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव हे चांगलेच आपटले आहेत.
गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटी सह 1 लाख 50 हजार 998 रुपयांवर पोहोचले आहेत.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात 8 हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 16 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)