भारतातले सर्वात भयानक 4 विमान अपघात, ज्यांची आठवण आली तरी…एक अपघात महाराष्ट्रातला!

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता जुन्या काही विमान अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

| Updated on: Jun 12, 2025 | 11:15 PM
1 / 5
अहमदाबादच्या विमान अपघातानंतर आता भारतात याआधी झालेल्या विमान अपघाताच्या दु:खद आठवणी ताज्या झाल्या आहेत. याआधी अनेकदा भारतात विमानाचे भीषण अपघात झालेले आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
कोझिकोड विमानतळावर 7 ऑगस्ट 2020 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट यांच्यासह 21 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हे विमान एअर इंडिया कंपनीचे होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
मंगळुरू येथे 22 मे 2010 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग 737-800 हे विमान कर्नाटकमधील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 158 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
पाटणा विमानतळावर उतरताना  17 जुलै 2000 रोजी अशाच एका विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानात बसलेल्या एकूण 58 तर घरात थांबलेल्या पाच लोकांचा मिळून एकूण 63 लोकांचा मृत्यू झाला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
तेव्हाचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट-491  या विमानाचाही असाच भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एकूण 63 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)