
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एक काळ गाजवला होता. लाखो चाहते असणाऱ्या या अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या की त्यांच्या जीवनाचा अतिशय वाईट अंत झाला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत. या अभिनेत्रीच्या देहाची बॉयफ्रेंडनेच बोली लावली होती. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया.

बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला आयुष्याने इतके दु:ख आणि वेदना सहन कराव्या लागल्या होत्या की नशेच्या आहारी गेली. तिने अगदी कमी वयात जगाचा निरोप घेतला. एका सुंदर नायिकेचा अंतही तिच्यासारखाच झाला, जी वयाच्या 34 व्या वर्षी मृत्यू पावली. ती प्रेक्षक आणि चित्रपट निर्मात्यांची आवडती बनली होती. जसजशी ती चित्रपटांमध्ये प्रसिद्ध होत गेली, तसतशी तिच्या खासगी आयुष्यात उलथापालथ झाली. घरच्यांनी अंतर ठेवले, तर पतीनेही पाठ फिरवली. जेव्हा तिचा मृत्यू झाला, तेव्हा तिच्या जवळ कोणीही नव्हते.

त्या दुर्दैवी अभिनेत्रीने शशी कपूर, राजकुमार आणि सुनील दत्त यांसारख्या सुपरस्टार्ससोबत चित्रपट केले. सुनील दत्त यांच्यासोबत तिचा पहिला चित्रपट ‘हमराज’ यशस्वी ठरला. 60-70 च्या दशकात तिची कारकीर्द शिखरावर होती. आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत तिचे नाव विमी आहे.

प्रेक्षकांनी विमी यांना पहिल्याच चित्रपटापासून डोळ्यांवर उचलून घेतले होते. पण तिच्य शेवटच्या काळात तिला जवळच्या लोकांची साथ मिळाला नाही. तिची अंत्ययात्रा एका कारमधून झाली. हिंदी सिनेमात तिला पहिली संधी बी.आर. चोप्रा यांनी ‘हमराज’ चित्रपटाद्वारे दिली. या चित्रपटात ती सुनील दत्त आणि राजकुमार यांच्यासोबत दिसली.

विमी एका श्रीमंत कुटुंबातून होत्या. त्या सुशिक्षित होत्या, कलेसंबंधी जाणकार होत्या. त्या उत्तम गायिकाही होत्या, पण घरच्यांना त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे आवडत नव्हते. अभिनेत्रीने आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे कुटुंबाला सोडले आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली.

शान-शौकतीच्या शौकीन असलेल्या विमी केवळ स्पोर्ट्स क्लबच चालवत नसत, तर गोल्फही खेळत असत. त्या सिनेमाच्या झगमगाटात इतक्या गुंतल्या की त्यांना चांगल्या-वाईटाचा फरक कळेना झाला होता. विमी यांचे वय कमी असताना एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाशी त्यांचे लग्न झाले. त्यांना दोन मुले झाली.

विमी जेव्हा आपल्या पतीसोबत एका पार्टीत गेल्या, तेव्हा त्यांची भेट संगीत दिग्दर्शक रवी यांच्याशी झाली. रवी विमी यांच्या सौंदर्याने प्रभावित झाले. त्यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. विमी यांनी फक्त एवढेच म्हटले, ‘एका विवाहित महिलेला कोण काम देईल?’ संगीत दिग्दर्शकाने त्यांची भेट बी.आर. चोप्रा यांच्याशी करून दिली, ज्यांनी त्यांना ‘हमराज’ चित्रपटातून लाँच केले.

सासरच्या मंडळींना विमी यांनी चित्रपटात काम करावे हे मान्य नव्हते. तरीही विमी यांना पतीने पाठिंबा दिला. पण त्यांच्या पालकांनी त्यांना मालमत्तेतून बेदखल केले. अचानक घर चालवण्याची जबाबदारी विमी यांच्या खांद्यावर आली.

‘हमराज’मुळे त्यांची कारकीर्द जोरात सुरू झाली, पण बी.आर. चोप्रा यांच्या करारामुळे त्या इतर ऑफर्स स्वीकारू शकल्या नाहीत. दोघांमध्ये मतभेद झाले, तेव्हा बी.आर. चोप्रा यांनी त्यांना करारातून मुक्त केले. विमी यांना चित्रपट मिळाले, पण त्यांना हवे तेवढे यश मिळाले नाही. निर्मात्यांनी हात मागे घेतले. चित्रपट मिळणे बंद झाले, तशी त्यांची जमा पूंजीही संपत गेली.

आर्थिक अडचणींमुळे विमी आणि त्यांच्या पतीचे नातेही बिघडू लागले. पतीला नशेचे व्यसन लागले होते. एका अहवालानुसार, तो विमी यांना छोट्या-मोठ्या निर्मात्यांसोबत काम करण्यास भाग पाडू लागला, त्यामुळे त्यांचे नाते आणखी बिघडले. परिणामी, घटस्फोट घेऊन विमी कोलकाताला गेल्या, जिथे त्या चित्रपट वितरक जॉली यांच्यासोबत राहू लागल्या.

विमी यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. जॉली यांच्यासोबतचे त्यांचे ‘प्रेम’ काही काळ टिकले, पण या नात्याने त्यांना दारूचे व्यसन लावले आणि त्यांना देहविक्रीच्या व्यापारात ढकलण्यात आले. जॉलीवर त्यांना उद्ध्वस्त करण्याचा आरोप लागला. कारकीर्दीसोबतच त्यांचे आरोग्यही खराब झाले. 1977 मध्ये अभिनेत्रीचे यकृत निकामी झाले. त्यांनी नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीचा मृतदेह घरी नेण्यासाठीही कोणी आले नव्हते. असे म्हणतात की अभिनेत्रीच्या अंत्य यात्रेत केवळ सुनील दत्त सहभागी झाले होते.