
बागा बिचः गोव्यातील सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण कोणतं असेल तर ते म्हणजे बागा बिच. येथील शांतता आणि असेलेले निसर्गसौंदर्य आपल्याला आणि तुमच्या जोडीदाराला हे सगळं मोहवून टाकणारं आहे. येथे फिरण्याआधी येथे मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचीही तुम्ही चव घेऊ शकता, आणि पुढची सफर करू शकता.

अगुआडा फोर्टः गोव्यातील समुद्राचं वेगळं सौंदर्य तुम्हाला अनुभवायचं असेल तर अगुआडा फोर्टला तुम्ही भेट द्या. गोवा राज्याची राजधानी पणजी पासून अगदी 18 किलोमीटरवर हे ठिकाण आहे.

अंजुना बिचः वाळूचा विस्तीर्ण किनारा, वॉटर स्पोर्टस आणि खास नाईटलाईफसाठी अंजुना बिच ओळखलं जातं. तुम्ही गेल्यानंतर ट्रीपच्या दुसऱ्या दिवशी या बिचवर जाऊन आनंद लुटू शकता. जोडीदारसोबत तुमचे तुम्हाला फोटोसेशन करायचे असेल तर यासारखे दुसरे ठिकाण मिळणार नाही.

म्हापसा मार्केटः जोडीदाराला शॉपिंग करायची हौस असेल तर आधी म्हापसा मार्केट घेऊन जा. असं म्हटले जाते की गोवा ट्रीप ही म्हापसा मार्केटला गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. गोव्यातील अनेक प्रसिद्ध वस्तू या बाजारात तुम्हाला मिळणार.

रेस्टॉरंट आणि पबः गोव्यात गेला की, तुम्हाला अनेक रेस्टॉरंट आणि पब पाहायला मिळतील. आणि तुमच्या जोडीदारासोबतच्या क्षणांना अविस्मरणीय कराल. या संस्कृतीसाठीच गोवा ट्रीपसाठी निवडलं जाते