
हरिद्वार : हरिद्वार (Haridwar) हे देशभरात एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक हरिद्वारला येत असतात. येथे असलेल्या गगां नदीत आंघोळ केल्यास सर्व पापांचे परिमार्जन होते, अशी या मागील कथा आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक (Devotee) हे हरिद्वारला भेट देण्यासाठी येत असतात. हरिद्वारला केवळ भाविकच नाही तर येथील निसर्ग अनुभवण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक (Tourist) देखील हरिद्वारला येत असतात. हरिद्वारच्या आसपास असे अनेक हिल स्टेशन आहेत, की ज्या हिलस्टेशनला देखील तुम्ही भेट देऊ शकतात.

मसुरी: मसुरी हे नाव समोर येताच येथील थंड हवा, आणि निसर्गाने नटलेले परिपूर्ण हिल स्टेशन तुमच्या डोळ्यासमोर उभे राहाते. आयुष्यात एकदा तरी मसुरीला जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. हरिद्वारपासून अवघ्या काही किलोमिटरवर हे सुंदर असे हिल स्टेशन आहे. तुम्ही तुमच्या परिवारासोबत काही दिवस या हिलस्टेनचा आनंद घेऊ शकता.

कनाताल : कनाताल हे एक छोटेशे शहर आहे. जे मसुरीपासून अवघ्या 38 किलोमीटर अंतरावर आहे. हे एक प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे. सोबतच कनाताल हे तिथे असलेल्या मंदिरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही मसुरीला आल्यास एकदा तरी कनातालला आवश्य भेट द्या.

रानीखेत : देशातील सुंदर शहरांचा विषय निघाल्यानंतर रानीखेतचे नाव सर्वात पुढे असते. रानीखेत हे डोंगरांमध्ये वसलेले आहे. येथील डोंगर, दऱ्या मोकळी मैदाने आणि मंदिरे नेहमीच पर्यटकांना भुरळ घातल असतात. तुम्हाला तुमच्या धकाधकीच्या जीवनातून चार दिवस निवांतपणा हवा असल्यास रानीखेतला आवश्य भेट द्या. हरिद्वारपासू अवघ्या काही अंतरावर हे सुदंर असे हिल स्टेशन आहे.

शिमला : शिमला हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ हरिद्वारपासून अवघ्या काही अंतरावर आहे. ज्यांना हिमवर्षाव आवडतो. अशा पर्यटकांसाठी शिमला हे एक नंदनवन आहे. येथे होणारी बर्फवृष्टी सुंदर अशा बर्फच्छदित दऱ्या हे पर्यटकाच्या आकर्षनाचे केंद्र असतात. शिमलाला भेट देण्यासाठी हिवाळाच्या काळ सर्वोत्तम असतो.