
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात कांगारूंनी प्रथम फलंदाजी करताना 388 धावा केल्या. या सामन्यामध्ये दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याने शतक करत विक्रम रचला आहे.

ट्रॅव्हिस हेड याने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये अवघ्या 59 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीमध्ये त्याने १० चौकार, ६ षटकार

ट्रॅव्हिसने या शतकासह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे.

मॅक्सवेल याने ४० बॉलमध्ये यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडविरूद्ध शतक केलं होतं. तर याआधी ५१ बॉलमध्ये २०१५ साली श्रीलंकेविरूद्ध मॅक्सवेलने आक्रमक खेळी केलेली.

आता या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी ट्रॅव्हिस हेड याचा समावेश झाला आहे. कमबॅक करणाऱ्या हेडने सर्वांच्या नजरा वेधल्या आहेत. कांगारूंनी आजच्या सामन्यातही दमदार फलंदाजी केली.