थलपती विजय मुख्यमंत्री होताच त्रिशा कृष्णनच्या हातावरील टॅटू तुफान चर्चेत; का म्हटलं जातंय ‘लकी’?

Trisha Krishnan's Tattoo : अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या हातावरील एका टॅटूने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या टॅटूचा नेमका अर्थ काय आहे आणि सोशल मीडियावर त्याची इतकी का चर्चा होत आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: May 15, 2026 | 11:35 AM
1 / 5
तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) या पक्षाने मोठा विजय मिळवला. 10 मे 2026 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) या पक्षाने मोठा विजय मिळवला. 10 मे 2026 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्रिशा यांच्या नात्याविषयी वेगवेगळ्या चर्चा होत असताना शपथविधी सोहळ्यात पारंपरिक पोशाखात त्रिशा पोहोचल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ तर व्हायरल झालेच, पण त्याचसोबत तिच्या हातावरील एका टॅटूनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.

3 / 5

शपथविधी सोहळ्यातील त्रिशाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. या फोटोंमध्ये त्रिशाच्या हातावरचा टॅटू स्पष्टपणे दिसत आहे. चाहते आणि युजर्स आता या टॅटूला विजय यांच्या ऐतिहासिक राजकीय विजयाशी जोडू पाहत आहेत. त्रिशाचा टॅटू हा विजय यांच्यासाठी 'लकी' ठरला का, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

4 / 5

सोशल मीडियावर काही ज्योतिषांनी असा दावा केला आहे की, विजय (कर्क) आणि त्रिशा (वृषभ) यांच्यातील ग्रहस्थिती राजकीयदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली आहे. 'न्यूज 18 कन्नड'च्या एका वृत्तानुसार त्रिशाच्या हातावरील हा टॅटू वृषभ राशीशी संबंधित आहे, जी त्रिशाची सूर्य राशीदेखील आहे.

5 / 5

मिळालेल्या माहितीनुसार, तिचा असा विश्वास आहे की या राशीने तिच्या आयुष्यात आणि यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, म्हणूनच तिने टॅटू म्हणून तो हातातवर गोंदवून घेतला आहे. विशेष म्हणजे विजय यांची राशी कर्क आहे. ज्योतिषांचा असा विश्वास आहे की, वृषभ आणि कर्क राशी एकमेकांसाठी अत्यंत अनुकूल असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us