नियम मोडला, शटर क्लोज! तुकाराम मुंढेंच्या FDA चा ब्लिंकिटला दणका; संभाजीनगरात परवाना निलंबित!

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील ब्लिंकिटच्या सातारा आणि हर्सुलमधील दोन आस्थापनांवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईची राज्यात चांगलीच चर्चा होत आहे.

| Updated on: Aug 18, 2026 | 9:13 PM
1 / 5
छत्रपती संभाजीनगर : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून एफडीएकडून राज्यभरात मोठी कारवाई केली जात आहे. नियम न पाळणाऱ्या, निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या तसेच अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मुंढे यांच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे.

2 / 5

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील ब्लिंकिटच्या सातारा आणि हर्सुलमधील दोन आस्थापनांवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईची राज्यात चांगलीच चर्चा होत आहे.

3 / 5

एफडीएने ब्लिंकइटच्या या दोन आस्थापनांमध्ये काम कसे चालते, याची तपासणी केली. यावेळी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आटळले. त्यानंतर FSSAI अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला.

4 / 5

सातारा परिसरात सिगारेट विक्री, एक्सपायर्ड अन्नसाठा करण्याबाबतच्या नियमांचेही उल्लंघन झाल्याचे आढळले. हर्सूलमध्ये अस्वच्छता, तुटलेल्या फरशा, कचरा आणि तापमान नोंदींचाही अभाव आढळला.

5 / 5

दरम्यान, ब्लिंकिटवर कारवाई केल्यानंतर तसेच त्यांचा परवाना निलंबित केल्यानंतर या काळात या स्थापनांना अन्नाची विक्री, साठवणूक आणि ब्लिंकिट ॲपवरील डिलिव्हरी बंद राहील असा आदेश देण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us