Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे इन्स्टावर कुणाला फॉलो करतात? उत्तर पाहून व्हाल हैराण!

Tukaram Mundhe: प्रशासकीय सेवेत आल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे अनेकदा त्यांची बदली झाली. तरी एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांची ओळख जनमानसांत कायम आहे.

| Updated on: Aug 18, 2026 | 8:57 AM
1 / 5
आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे वेगळी ओळख निर्माण करणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे सोशल मीडियावरही तितकेच लोकप्रिय असल्याचं पहायला मिळतंय. त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलकडे पाहिलं तर एक गोष्ट लगेच लक्ष वेधून घेते, ते म्हणजे त्यांना फॉलो करणाऱ्यांचा संख्या. ही संख्या जरी लाखोंमध्ये असली तरी ते स्वत: मात्र कुणाला फॉलो करतात, हे पाहून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल.

2 / 5
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे हे केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे तर आपल्या स्पष्ट आणि शिस्तप्रिय भूमिकेमुळेही लोकप्रिय आहेत. त्यांच्या कामातील हीच स्पष्टता त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरही दिसून येते. इन्स्टाग्रामवर त्यांचे 2.7 मिलियन (दशलक्ष) फॉलोअर्स आहेत. पण त्यांच्या प्रोफाइलवरील 'Following'ची यादी जवळपास शून्य असल्याची बाब अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

3 / 5
त्यांच्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये IAS, Public Figure, Ethical Leader, Public Service आणि Youth Icon अशा शब्दांचा उल्लेख आहे. तर त्यांच्या पोस्टमध्ये जनजागृती, सामाजिक प्रश्न, आरोग्य, स्वच्छा आणि नागरिकांशी संबंधित विविध विषय पहायला मिळतात.

4 / 5
सोशल मीडियावर कोणाला फॉलो करण्यापेक्षा लोकांनी आपल्या कामाला आणि शिस्तीला फॉलो करावं, अशीच त्यांची प्रतिमा असल्याचं त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून जाणवतं. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांच्या धडक कारवायांचं सत्र सुरूच आहे.

5 / 5
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या तुकाराम मुंढेंनी कठोर परिश्रमाच्या जोरावर UPSC परीक्षेत यश मिळवलं. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांच्या निर्णयक्षमतेची आणि कामाच्या वेगाची जोरदार चर्चा झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us