Photos : कम्युनिस्ट आले, काँग्रेसचीही साथ, ठाकरे गटाच्या नेतृत्त्वात हिंदी सक्तीच्या GR ची होळी; आझाद मैदानात काय घडलं?

मुंबईच्या आझाद मैदानात ठाकरे गटाच्या नेतृत्त्वात हिंदी भाषा सक्तीचा विरोध करण्यासाठी राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली.

| Updated on: Jul 01, 2025 | 5:25 PM
1 / 6
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवण्याच्या सरकारच्या धोरणाला विरोधी पक्षांकडून विरोध केला जातोय. ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, शरद पवार गट एकत्र यांनी हिंदी सक्तीच्या या धोरणाला विरोध केला आहे.

2 / 6
दरम्यान, ठाकरे गटाने हिंदी सक्तीच्या विरोध म्हणून आज (29 जून) हिंदी सक्तीच्या जीआरची होळी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: आझाद मैदानावर जाऊन या आंदोलनात सहभाग नोंदवला.

3 / 6
ठाकरे गटाच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात हिंदी सक्तीला विरोध करणारे अनेक समविचारी पक्ष एकत्र आले होते.

4 / 6
यात कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, मनसे आदी पक्षांनीही या आंदोलात आपला सहभाग नोंदवला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हेदेखील उपस्थित होते.

5 / 6
आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली.

6 / 6
दरम्यान, या आंदोलनानंतर येत्या 5 जुलै रोजीचा मोर्चा हा भव्य असेल. या मोर्चात लोक महाराष्ट्रभरातून सहभागी होतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.