
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल खूप वाईट टिप्पणी केलेली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकोनॉमी म्हणजेच मृत अर्थव्यवस्था म्हटलेलं. रशियाकडून भारताच्या तेल खरेदीवर डोनाल्ड ट्रम्प नाराज होते. अमेरिकेमुळे भारताची अर्थव्यवस्था चालते असं त्यांना वाटतं. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण संबंध आहेत.

ट्रम्प नाराजी व्यक्त करताना म्हणालेले की, :"भारत रशियासोबत काय करतो, याची मी फिकिर करत नाही. ते दोघे मिळून आपली अर्थव्यवस्था खाली पाडू शकतात" ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर भारतात खूप टीका झालेली. अनके एक्सपर्ट्सनी त्यांच्या या वक्तव्याला चुकीच ठरवलेलं. आता अमेरिकेच्याच एका मोठ्या रेटिंग एजन्सीने भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल आपली रेटिंग अपग्रेड केली आहे.

अमेरिकी क्रेडिट रेटिंग एजेंसी S&P Global ने भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल आपली रेटिंग सुधारली आहे. S&P Global ने भारताची लॉन्ग टर्म अनसॉलीसिएटेड सॉवरेन क्रेडिट रेटिंग “BBB-” वाढवून “BBB” केली आहे. या रेटिंगवरुन दिसून येतं की, जागतिक निकषांनुसार भारतीय अर्थव्यस्थेची स्थिती मजबूत आहे.

क्रेडिट रेटिंग एक निकष असतो, त्या आधारावर कुठल्याही देशाची आर्थिक विश्वसनीयता निश्चित केली जाते. S&P Global ने भारताची रेटिंग वाढवली त्यामागे मजबूत आर्थिक पाया, नीती स्थिरता आणि निरंतर इंफ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक हे प्रमुख कारण असल्याच सांगितलं. येणाऱ्या दोन-तीन वर्षात भारताची आर्थिक वृद्धि वेगवान राहिलं असं एजन्सीने म्हटलय. अमेरिकेच्या टॅरिफवर सुद्धा S&P Global ने भाष्य केलय. अमेरिकेचा टॅरिफ किंवा जागतिक अस्थिरतेमुळे भारत प्रभावित होईल. पण त्याचा प्रभाव मॅनेजेबल असेल असं S&P Global ने म्हटलं.

भारताने मागच्या काही वर्षात आर्थिक सुधारणा, टेक्नोलॉजी आधारित प्रशासन आणि इंफ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे फक्त देशातच रोजगाराची संधी वाढलेली नाही, तर दीर्घकाळासाठी विकास दराला मजबुती मिळालीय असं S&P च्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे.