
अनेकजण कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापरतात. मात्र सतत इअरबड्स वापरणे फार घातक ठरू शकते. यामुळे कानांचे मोठे नुकसान होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कान साफ करण्यासाठी सतत इअरबड्स वापरल्याने कानातली घाण अनेकदा बाहेर येण्याऐवजी आणखी आत जाते. ही घाण नंतर कानांच्या पडद्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे ऐकायला कमी येऊ शकतं. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

इअरबड्स तयार करण्यासाठी अनेकदा कापसाची रुई वापरली जाते. ही रुई कानांच्या नसांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सतत इअरबड्स वापरणे चुकीचे ठरू शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कानांचा पडदा फार नाजूक असतो. त्यामुळे रुई कानांच्या पडद्यांना लागली तर तो फाटण्याची भीती असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेकदा इअरबड्सची रुई ही कानातील घाणीसोबत चिटकते. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता बळावते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)