खासदार चंद्रशेखर आझाद यांना मोठा धक्का, कोर्टाच्या निर्णयाने टेन्शन वाढवलं, थेट…
खासदार चंद्रशेखर आझाद यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाच्या एका निर्णयाने त्यांचं टेन्शन वाढवलं आहे.

खासदार चंद्रशेखर आझाद हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात साहिलाबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. त्याप्रकरणी भीम आर्मी, आझाद समाज पार्टीचे नगीनाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. गाझियाबादच्या कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यांची सपंत्ती जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
कोर्टाच्या कामकाजादरम्यान वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांची संपत्ती जप्त करणयाचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत कलम 323 आणि 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चंद्रशेखर यांनी 8 वर्षाआधी एका लग्नसोहळ्यात तरुणाला कानशिलात लगावली होती. या प्रकरणात वारंवावर समन्स मिळाल्यानंतरही चंद्रशेखर कोर्टात हजर झाले नाही. तसेच चंद्रशेखर हे गुरवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टात हजर झाले नाही. यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी केलं आहे.
काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर आझाद यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकीवर भाष्य केलं. त्यांनी चंदौसी विधानसभा मतदारसंघात निवडणूक जिंकण्याचा देखील दावा केला आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यास गरिबांना शिक्षण, आरोग्याची सेवा दिली जाईल, असं आश्वासन दिलं.
'सरकारी शाळा सुधारल्या जातील. चंद्रशेखर यांनी पोलिसांची ड्युटी 8 तास करणे, कामगारांना मजुरी किमान 765 रुपये प्रतिदिन करू, असेही त्यांनी आश्वासन दिलं.