
uttarakhand-ice-storm

पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे.

त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत. तसेच माणसे, गुरेढोरेही वाहून गेली असून शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

या ठिकाणी प्रशासानाचे कर्मचारी आणि रेस्क्यु ऑपरेशन टीम पोहोचली असून युद्धपातळीवर रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे.

तपोवन रैणी परिसरात हिमकडा तुटल्याने ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टला मोठी हानी पोहोचली आहे. नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे अलकनंदा नदीच्या किनारी असलेल्यांनी लवकरात लवकर दुसरीकडे शिफ्ट व्हावं, असं आवाहन चमोली पोलिसांनी केलं आहे.

(फोटो- ANI)