
वैभव सूर्यवंशीची मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी निवड झाली. मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराचा मानकरीही वैभव सूर्यवंशीच राहिला. दोन्ही अवॉर्ड एकत्र जिंकणारा तो पहिला खेळाडू बनला. पण आश्चर्याची बाब ही आहे की, वैभव आता पुन्हा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाही.

वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. 2026 वर्ल्ड कप म्हणजे आता तो फक्त 14 वर्षांचा आहे. वयाच्या हिशोबाने ते 2030 पर्यंत अंडर 19 वर्ल्ड कपसाठी पात्र आहे. पण बीसीसीआयच्या एका कठोर नियमामुळे तो आता पुन्हा अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये दिसणार नाही.

बीसीसीआयने हा नियम 2016 साली लागू केला होता. बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीने हा निर्णय घेतलेला. जो खेळाडू एकदा भारताकडून अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळलाय, तो वयाच्या निकषात बसत असला तरी पुन्हा दुसर्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकत नाही. सोबतच U19 सिस्टिममध्ये एन्ट्री करणारे खेळाडू जास्तीत जास्त दोन सीजनच U 19 क्रिकेट खेळू शकतात.

हा निर्णय खासकरुन ओवरएज खेळाडूंची समस्या संपवण्यासाठी घेतला होता. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक वर्षांपासून एक मोठं आव्हान राहिलय. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने सुद्धा 2015 साली वय घोटाळा मोठा मुद्दा असल्याचं म्हटलं होतं.

या नियमाआधी अनेक खेळाडू दोन वर्ल्ड कपमध्ये खेळलेत. यात रवींद्र जाडेजा (2006 आणि 2008), विजय जोल (2012 आणि 2014), 2016 स्क्वॉडमधील सदस्य अवेश खान, सरफराज खान आणि रिकी भुई 2014 मध्ये सुद्धा खेळले होते.