आज स्वर्गातली परी बघितली शेवटी, मराठी अभिनेत्रीच्या चमकदार गाऊनमधील लुकने लावलं वेड, कोण आहे ती?

मॉरिशसच्या समुद्रकिनारी चमकदार ड्रेसमध्ये मराठी अभिनेत्रीचं खास फोटोशूट. सोनेरी गाऊनमधील फोटो पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव.

| Updated on: Oct 05, 2026 | 2:37 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2 / 5

विशेष म्हणजे वैदेही ही प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगनादेखील आहे. नुकतंच वैदेहीने मॉरिशसच्या सुंदर समुद्रकिनारी केलेलं खास फोटोशूट चर्चेत आलं आहे. या फोटोशूटमध्ये तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

3 / 5

सोनेरी रंगाचा आकर्षक डिझायनर गाऊन परिधान करत वैदेहीने समुद्रकिनाऱ्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो वैदेहीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5

या फोटोंसोबत तिने ‘Mauritius Waters…Day Light!’ असं खास कॅप्शन दिलं आहे. तिच्या या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकजण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.

5 / 5

मॉरिशसच्या निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर चमकदार गाऊनमधील वैदेहीचा लूक अधिकच खुलून दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us