Vaishnavi Hagavane Deathcase : ती गोष्ट घडली अन् वैष्णवीचे मारेकरी सापडले; हगवणे बापलेक कुठे कुठे लपले?

वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील याला अटक केली आहे. एका लॉजवर असताना या दोघांना पोलिसांनी अटक केली असून आता पुढची कारवाई करण्यात येणार आहे.

| Updated on: May 23, 2025 | 2:12 PM
1 / 7
वैष्णवी शशांक हगवणे या विवाहितीने राहत्या घरी जीवन संपवलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. तिला मारहाण केली जायची. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. तर वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिचा खून केल्याचं वैष्णवीच्या आईवडिलांनी म्हटलं आहे.

2 / 7
या प्रकरणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आधी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे अटक केली होती. आज आठ दिवसानंतर पोलिसांनी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे.

3 / 7
पोलीस तब्बल आठ दिवस राजेंद्र आणि सुशीलच्या मागावर होते. पोलिसांनी अटक करू नये म्हणून या दोघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी लपायला सुरुवात केली होती. दोघेही एका लॉजवरही राहिले होते.

4 / 7
हगवणे कुटुंबावर 17 मो रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुशील आणि राजेंद्र हगवणे फरार होते. या दोघांनी बावधन इथे मुहूर्त लॉजवर दोन दिवस मुक्काम केला. त्यानंतर ते कोल्हापूरला गेले. एक दिवस कोल्हापूरला राहिले. नंतर ते पुण्यातील मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात आले.

5 / 7
पोलीस दोघांच्या मागावरच होते. हो दोघे एका हॉटेलात थांबले होते. त्या हॉटेलात राजेंद्रने त्याच्या मित्रांसोबत मटणावर ताव मारला होता.

6 / 7
हॉटेलात मटणावर ताव मारतानाचा त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत.

7 / 7
राजेंद्र आणि सुशीलने ज्या हॉटेलात मटणावर ताव मारला, त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ट्रॅक केलं आणि अटक केली. दोघांनाही बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं.