
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. वैष्णवीच्या लग्नात तिच्या आई-वडिलांनी तब्बल 51 तोळे सोनं, फॉर्च्यूनर गाडी असं बरंच काही दिलं होतं. मात्र तिचा सासरी अतोनात छळ झाला, त्यातून तिने नंतर आत्महत्या केली.

दरम्यान, आता वैष्णवीच्या लग्नातही तिच्या आई-वडिलांनी लाखोंनी खर्च केल्याचं समोर आलं आहे.


तसेच लग्नाच्या स्टेजच्या सजावट करण्यासाठी वैष्णवीच्या आई-वडिलांना तब्बल बावीस लाख रुपये खर्च करायला लावले होते.

पाच हजार जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. एक व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार याप्रमाणे पन्नास लाख जेवणावर खर्च झाला होता.


हगवणे कुटुंबीयांनी या लग्नाचे कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावले. त्याचे लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावले. अशाप्रकारे वैष्णवीच्या लग्नात एका दिवसासाठी तब्ब्ल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.