Vastu Tips : उशीखाली या 6 वस्तू ठेवून झोपता ? आजच बदला ही सवय, अन्यथा..
अनेकांना झोपताना उशीखाली वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याची सवय असते. मात्र, असं करणं योग्य नाही. चला तर मग, झोपताना उशीखाली कोणत्या वस्तू अजिबात ठेवू नयेत, हे जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार, झोपताना आपल्या आजूबाजूला कोणत्या वस्तू आहेत, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं मानलं जातं. काही वस्तू जवळ ठेवणं अशुभ असल्याचं मानलं जातं. अनेकांना झोपताना उशीखाली विविध वस्तू ठेवण्याची सवय असते. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही सवय योग्य मानली जात नाही. चला तर मग, झोपताना उशीखाली कोणत्या वस्तू ठेवणं टाळावं, हे जाणून घेऊया.
उशीखाली पाकीट ठेवू नका - वास्तुशास्त्रानुसार, झोपताना उशीखाली पाकीट ठेवणं टाळावं. अनेकजण कधी जाणूनबुजून, तर कधी नकळत आपलं पाकीट उशीखाली ठेवतात. मात्र, ही चांगली सवय नसल्याचं मानलं जातं. असं केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी वास्तुशास्त्रात धारणा आहे.
उशीखाली चाव्या नकोत - घर, वाहन किंवा तिजोरीच्या चाव्या उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असेल, तर ती बदलणे योग्य मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतो आणि कामांमध्ये अडथळे येऊ शकतात, अशी धारणा आहे.
घड्याळ ठेवूच नये - अनेक जण झोपताना हातातील घड्याळ काढून उशीजवळ किंवा उशीखाली ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही सवय टाळावी. असे केल्याने मन अस्वस्थ राहते आणि मानसिक शांततेवर परिणाम होतो, असं मानलं जातं.
उशीखाली मोबाइल फोन ठेवणे टाळा - रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर रील्स पाहिल्यानंतर अनेक जण मोबाइल फोन उशीखाली किंवा उशाजवळ ठेवून झोपतात. मात्र, ही सवय टाळणे अधिक योग्य आहे. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मोबाइल उशीखाली ठेवून झोपणे टाळावं. मोबाईलच्या रेजही आपल्यासाठी, मेंदूसाठी चांगल्या नसतात.
उशीखाली जुनी बिले ठेवू नका - वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, उशीखाली जुनी बिले ठेवणं टाळावं. असं केल्याने पैशांशी संबंधित चिंता वाढू शकतात, अशी समजूत आहे. त्यामुळे जुनी बिले व्यवस्थित फाइलमध्ये ठेवावीत. त्यांची गरज नसेल, तर योग्य पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावावी.
उशीखाली पुस्तकं ठेवून झोपू नका - वाचन करताना झोप आल्यामुळे अनेक जण पुस्तक उशीखाली ठेवून झोपतात. मात्र, अशी सवय टाळावी, असे वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. पुस्तके आणि अभ्यासाशी संबंधित साहित्य देवी सरस्वतीशी जोडलं जातं. त्यामुळे पुस्तकांचा आदर राखावा, अशी धार्मिक मान्यता आहे. उशीखाली पुस्तक ठेवून झोपल्याने एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो, असंही मानलं जातं. (डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)