तुमच्या घराच्या कोपऱ्यातील कोळ्याची जाळी बदलू शकतात तुमचे नशीब, कधीच करु नका दुर्लक्ष
उन्हाळ्यात घरात कोळ्याची जाळी होणे ही सामान्य बाब वाटत असली तरी, वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा, पती-पत्नीमध्ये वाद आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

उन्हाळा सुरू झाला की उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे घराच्या कोपऱ्यांत, भिंतींवर किंवा छतावर कोळ्याची जाळी दिसतात ही एक सामान्य बाब आहे. अनेकदा आपण याकडे निव्वळ धूळ किंवा घाण समजून दुर्लक्ष करतो.

मात्र, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोळ्याची जाळी असणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही जाळी केवळ घराचे सौंदर्यच खराब करत नाहीत, तर घरात नकारात्मक ऊर्जा देखील पसरवतात.

जर तुमच्या बेडरूममध्ये कोळ्याची जाळी असतील, तर ती तात्काळ स्वच्छ करा. वास्तू शास्त्रानुसार, बेडरूममधील जाळ्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण होऊन विनाकारण वाद वाढण्याची शक्यता असते.

देवघर हे घराचे सर्वात पवित्र स्थान असते. जर येथे कोळ्याची जाळी जमा झाली, तर ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. यामुळे घरातील प्रसन्नता कमी होते, म्हणून दररोज पूजेपूर्वी देवघराची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णा वास करते. या ठिकाणी जाळी असणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विज्ञानानुसार, जाळ्यांमधील साचलेल्या घाणीत जीवाणू वाढतात, ज्यामुळे अन्नाद्वारे संसर्ग होऊन घरातील सदस्य आजारी पडू शकतात.

घरात कुठेही जाळी दिसल्यास ती त्वरित काढून टाका. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा घराचे कोपरे, छत आणि फर्निचरच्या मागची जागा स्वच्छ करा. स्वयंपाकघराची फरशी दररोज पुसून कोरडी ठेवावी, जेणेकरून कीटक आणि कोळी तिथे वास्तव्यास येणार नाहीत. घरात दररोज सकाळी-संध्याकाळी उदबत्ती आणि तेलाचा दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कीटकांना दूर ठेवण्यास मदत मिळते.