
प्रत्येकालाच नवे घर हवे असते. काही जणांचे हे स्वप्न पूर्ण होते. मात्र नव्या घरात जाऊनही अनेकांच्या मागची पीडा संपत नाही. वास्तूशास्त्राच्या काही नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकदा अशा अडचणी येतात, असे म्हटले जाते. हे नियम काय आहेत, ते जाणून घेऊ या...

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार नव्या घरात वस्तू ठेवल्यास सकारात्मक उर्जा येते असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रानुसार नव्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला असायला हवा. दरवाजा या दिशांना असेल तर सकारात्मक उर्जा येते.

घरात तुम्ही देवघर करत असाल तर त्याची दिशा ही उत्तर-पूर्व असायला हवी. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार देवघर कधीच किचन किंवा वॉशरुमजळव नसावे. ही चूक केल्यास घरात नकारात्मक उर्जेची निर्मिती होऊ शकते. त्याचा नंतर तुम्हाला तोटा होऊ शकतो.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार घरातील मास्टर बेडरुम ही नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेलाच असायला हवी. मास्टर बेडरुमची अशी रचना केल्यास घरातील सदस्यांना मानसिक शांती मिळते. तसेच घरात समृद्धी येते.

घरात किचन फार महत्त्वाचे असते. किचन नेहमीच दक्षिण-पूर्व म्हणजेच अग्नेय दिशेला असायला हवे, असे सांगितले जाते. वास्तूशास्त्रानुसार घराची अशी रचना केल्यास घरात सुख, शांती नांदते, असा दावा केला जातो.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.