
वास्तूशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेचा संबंध हा यश, धन आणि स्थिरतेशी असतो. यश, धन आणि स्थिरतेशी संबंधित एखादी वस्तू दक्षिण दिशेला ठेवल्यास तुमचे नशीब पालटू शकते, असे म्हटले जाते.

घरातल्या हॉलमध्ये दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीला फिनिक्स पक्षाचा फोटो लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील सुख-समृद्धीत वाढ होते. घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते, असे बोलले जाते. श्रीमंत लोकांच्या घरात व फिनिक्स पक्षाचा फोटो आढळतो.

घरात दक्षिण दिशेला कुटुंबातील पूर्वजांचा फोटो लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात प्रगती नांदते असे बोलले जाते. त्यामुळेच श्रीमंतांच्या घरात नेहमी त्यांच्या पूर्वाजांचा फोटो आढळतो.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार घराच्या दक्षिणेस झाडू ठेवणे शुभ असते. तसे केल्यास घरात लक्ष्मी नांदते असे बोलले जाते. फक्त घराच्या दक्षिणेस झाडू ठेवताना तो कोणालाही सहज दिसायला नको याची काळजी घ्यावी.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.