
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर हे दोघं अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येतात. कतरिना-विकीची जोडी 'मेड फॉर इच अदर' असल्याचं चाहते म्हणतात.

विकीने त्याच्या प्रेमळ पत्नीला खास विशेषण दिलं आहे. पत्नीचं वर्णन करतानाचा त्याचा व्हिडीओ कतरिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. 'माझं वर्णन करताना माझा प्रिय पती..' असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

या व्हिडीओमुळे विकी सुरुवातीला हसतो आणि त्यानंतर कतरिनाला म्हणतो, "विचित्र किंतु सत्य प्राणी है आप." आपल्या आगामी 'छावा' या चित्रपटाच्या व्यग्र प्रमोशनमधून पत्नीसाठी विकीने थोडा वेळ काढला आहे. त्याचदरम्यान कतरिनाने हा क्युट व्हिडीओ शूट केला आहे.

चाहत्यांना विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. 14 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विकीसोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

कतरिनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या वर्षी ती 'टायगर 3' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तिने सलमान खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिचा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही.