
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू विराट कोहली याचे इन्स्टाग्राम खाते अचानक बंद झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्याचे खाते एकाएक, अचानक का बंद झाले यावर सोशल मीडियावर प्रश्नांची मालिका सुरू झाली. सोशल मीडियावर हेच ट्रेडिंग होत होते. पण थोड्याच वेळानंतर हे खाते पुन्हा सक्रिय झाले. इन्स्टाग्रामवर विराटचे 27 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

या सर्व प्रकरणावर इन्स्टाग्राम, मेटा अथवा विराटकडून कोणतेही अधिकृत माहिती अथवा प्रतिक्रिया देण्यात आली नाही. इन्स्टाग्राममधून विराट मोठी कमाई करतो. पण त्याचं खातं हे डिलिट का झालं, ते हॅक झालं की काय याची मोठी चर्चा सुरू झाली. पण खातं पुन्हा सक्रिय झाल्याने चाहत्यांना हायसं वाटलं.

समाज माध्यमावर त्यांची मोठी फॅनफॉलोइंग आहे. तो याबाबत किंग कोहलीच आहे. देशातच नाही तर परदेशातील चाहतेही त्याला फॉलो करतात. पण अचानक त्याचं खातं नॉट फाऊंड असा संदेश दिसल्याने त्यावर प्रतिक्रियांचा महापूर आला. त्याचे इन्स्टाग्रामवर 274 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

विराट मैदानावर तर जलवा दाखवतोच. पण समाज माध्यमांवर सुद्धा त्याची जोरदार चर्चा असते. या माध्यमातून त्याची कोट्यवधींची कमाई होते. एका इन्स्टाग्राम पोस्ट साठी तो मोठी रक्कम घेत असल्याचे मानले जाते. माध्यमातील वृत्तानुसार, विराट कोहली एका पोस्टसाठी 12 ते 14 कोटी रुपये शुल्क घेतो. त्याची फॅनफॉलोइंग अधिक असल्याने तो जबरदस्त कमाई करतो.

विराट कोहली हा इन्स्टाग्राममधून सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी आहे. त्यामुळे त्याचे इन्स्टाग्राम खाते अचानक दिसेनासे झाल्याने केवळ सोशल मीडियात खळबळ उडाली नाही तर व्यावसायिक स्तरावर आणि उद्योगजगतातही त्याचे पडसाद उमटले. कारण विराटला स्पॉन्सर करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. काही जणांच्या मते ही एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी सुद्धा असू शकते.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील चेहऱ्यांमध्ये तो सर्वात पुढे आहे. तर या यादीत तो सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय आहे. रोनाल्डो एका पोस्टसाठी 25 कोटी रुपये घेत असल्याचा दावा करण्यात येतो. तर विराट एका पोस्टसाठी 14 कोटी रुपये शुल्क घेत असल्याचा दावा करण्यात येतो.