Virat Kohli : विराट कोहलीला मानलं, आयपीएलमध्ये त्याने बनवला एक खास रेकॉर्ड, हे फार कमी खेळाडूंना जमतं
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्समध्ये आयपीएलचा 34 वा सामना झाला. विराट या सामन्यात तुफान खेळलाच. पण त्याने एक खास रेकॉर्डही आपल्या नावावर केला.

विराट कोहली जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा कुठला ना कुठला रेकॉर्ड तुटतो किंवा बनतो. गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात असच काहीसं झालं. विराट कोहलीने या मॅचमध्ये गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. यावेळी त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला. (Photo PTI)

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक 800 चौकार मारणारा खेळाडू बनला आहे. सोबतच आयपीएलमध्ये त्याचे 300 सिक्सही पूर्ण झाले आहेत. विराट कोहलीने राशिद खानच्या शॉर्ट चेंडूवर मिड विकेटला सिक्स मारला. सोबतच त्याने षटकारांचं त्रिशतक पूर्ण केलं. (Photo PTI)

आयपीएलमध्ये 300 सिक्स मारणारा विराट कोहली तिसरा खेळाडू आहे. त्याने 266 इनिंगमध्ये 300 सिक्स मारले आहेत. रोहित शर्माच्या नावावर 310 सिक्स आहेत. ख्रिस गेलने सर्वाधिक 357 सिक्स मारले आहेत. (Photo PTI)

विराट कोहलीने गुजरात टायटन्स विरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याच्या आयपीएल करिअरमधील हे 66 वं आणि या सीजनमधलं तिसरं अर्धशतक आहे. (Photo PTI)

विराट सोबत देवदत्त पडिक्कलही गुजरात टायटन्स विरुद्ध जबरदस्त खेळला. या डावखुऱ्या फलंदाजाने 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं. (Photo PTI)