विराट कोहलीला दहावीला मिळाले होते इतके गुण, मार्कशीट शेअर करत स्वत:च केला खुलासा

| Updated on: Mar 30, 2023 | 1:37 PM

विराट कोहली हा भारतीय संघातील दिग्गज खेळाडू आहे. त्याने आपल्या खेळीने आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. क्रिकेटविश्वात त्याला रनमशिन्स नावानं ओळखलं जातं. पण आता विराट दहावीच्या मार्कशीटमुळे चर्चेत आला आहे.

1 / 5
विराट कोहली क्रिकेटमधील मोठं नाव आहे. त्याने आपल्या फलंदाजीने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. एक एक करत त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. पण अभ्यासाच्या बाबतीत विराटची आकडेवारी काही वेगळीच आहे. (PC- PTI)

2 / 5
कोहलीने गुरुवारी चुकून आपल्या कू अकाउंटवर दहावीची मार्कशीट शेअर केली. या मार्कशीटच्या खाली त्याने स्पोर्ट्स लिहिलं होतं आणि प्रश्नचिन्ह दिलं होतं. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. ज्या गोष्टीचं सर्वाधिक महत्त्व होतं त्याचीच किंमत कमी होती. (PC- PTI)

3 / 5
कोहलीने सांगितलं की, शाळेत गणित हा विषय नाआवडीचा होता. गणित लोकं का शिकतात? असा प्रश्न कायम पडायचा. दहावीला कसंही करून गणितात पास होणं हाच त्याचा हेतू होता. कारण पुढच्या शिक्षणात हा विषय अभ्यासात पर्याय म्हणून होता. (PC- Virat Kohli koo)

4 / 5
शाळेत कोहलीचं गणित चांगलं नसलं तरी क्रिकेटमध्ये धावांचं गणित वेगळंच आहे. त्याने एक एक अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. भविष्यातही अनेक विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.  (PC- RCB Twitter)

5 / 5
आयपीएलमध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. आतापर्यंत फ्रेंचाईसीने एकही जेतेपद जिंकलेलं नाही. त्यामुळे यंदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी विराट कोहलीचा संघ तयार आहे. (PC- PTI)